Income Tax Slab : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी मध्यमवर्गाला दिलासा देत नव्या कररचनेत १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त (Tax Free) करत असल्याची घोषणा केली. नव्या कररचनेत अर्थमंत्री यांनी फेरबदल जाहीर केलेत. तर,नवं आयकर विधेयक येत्या आठवड्यात आणणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा;सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ
नवी कररचना नेमकी काय ?(Income Tax Slab)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नव्या कर रचनेतील फेरबदल जाहीर केले. नव्या कररचनेत ० ते ४ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. ४ ते ८ लाखांपर्यंत ५ टक्के कर आकारला जाणार आहे.८ ते १२ लाख रुपयांपर्यंत १० टक्के प्राप्तिकर आकारला जाईल. १२ लाख ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के प्राप्तिकर आकारला जाईल.१६ ते २० लाख उत्पन्न असेल त्यांना २० टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल. तर, २० लाख ते २४ लाख रुपयांचं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना २५ टक्के कर द्यावा लागेल. २४ लाखांपेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना ३० टक्के कर द्यावा लागेल.
अवश्य वाचा : “मराठी माणूस कलहशील”;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
नव्या कररचनेनुसार,ज्यांचं उत्पन्न ८ लाखांपर्यंत असेल त्यांना ३० हजारांचा फायदा होईल. ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल त्यांना ४० हजारांपर्यंत लाभ होईल. १० लाख ज्याचं उत्पन्न असेल त्यांना ५० हजार रुपये, ११ लाख रुपये ज्याचं उत्पन्न असेल त्यांना ६५ हजार, १२ लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना ८० हजारांचा फायदा होईल. १६ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना ५० हजार,२०लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना ९०हजार रुपये, २४ लाखांचं उत्पन्न असेल त्यांना वार्षिक १ लक्ष १० हजारांचा फायदा होईल.
जुन्या कररचनेचे दर काय ?(Income Tax Slab)
जुन्या कररचनेत अडीच लाख रुपयांपर्यतचं उत्पन्न करमुक्त आहे. २.५ ते ५ लाखांपर्यंत ५ टक्के कर द्यावा लागेल. ५ ते १० लाख रुपये उत्पन्नापर्यंत २० टक्के कर लागतो. १० ते १५ लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना ३० टक्के कर द्यावा लागतो. १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल त्यांना ३० टक्के कर जुन्या कररचनेप्रमाणे द्यावे लागतील.
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी १२ लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न ही अविश्वसनीय करमुक्त मर्यादा असल्याचं म्हटलं आहे. १२ लाखांपर्यंत कर लागेल मात्र रिबेट मिळेल, त्यामुळं कर भरावं लागेल. कॅपिटल गेन आहे, त्यावरील कर भरावा लागेल. मात्र, १२ लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर नोकरदारांना ८० हजारांचा फायदा होईल. नव्या कररचनेत १२ लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न केल्यानं जुन्या कररचनेतून नव्या कररचनेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या वाढेल.