Ayodhya ram Temple : राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणी नंतर अयोध्येला (Ayodhya) जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. सरत्या २०२४ मध्ये राम मंदिराने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अहवालानुसार,ताजला मागे टाकून २०२४ मध्ये अयोध्या हे उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) टॉप डेस्टिनेशन बनले आहे. ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असले तरी २०२४ मध्ये अयोध्येने सर्व विक्रम तोडलेत.
नक्की वाचा : शालेय गणवेश देण्याच्या निर्णयात पुन्हा बदल;पूर्वीप्रमाणेच मिळणार गणवेश
अयोध्येने यूपीमध्ये केला नवा विक्रम (Ayodhya Ram Temple)
पर्यटनाच्या बाबतीत ताजमहालला मागे टाकत अयोध्येने यूपीमध्ये नवा विक्रम केला आहे. २०२४ मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या ताजमहाल पेक्षा जास्त होती. ज्याचे प्रमुख कारण राम मंदिर मानले जाते. उत्तर प्रदेशने जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान उल्लेखनीय ४७६.१ दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करुन नवीन पर्यटन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या कालावधीत अयोध्येमध्ये १३५.५ दशलक्ष देशी पर्यटक आणि ३१५३ आंतरराष्ट्रीय पर्यटक आले आहेत. राम मंदिराचे उद्घाटन हे यामागचे मुख्य कारण आहे. या तुलनेत आग्राला १२५.१ दशलक्ष पर्यटक आले आहेत.ज्यात ११५.९ दशलक्ष देशातील प्रवासी आणि ९,२४,००० आंतरराष्ट्रीय पर्यटक आहेत.
अवश्य वाचा : ‘त्या’ आरोपींच्या पाठीशी कोण याची उकल व्हायला हवी, निलेश लंकेचं मस्साजोगमध्ये विधान
धार्मिक पर्यटनाच्या बुकिंगमध्ये ७० टक्के वाढ (Ayodhya Ram Temple)
पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी राज्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की,उत्तर प्रदेशने गेल्या वर्षी ४८० दशलक्ष पर्यटकांचे स्वागत केले होते.हा आकडा यावर्षी केवळ नऊ महिन्यांत गाठला गेला आहे. धार्मिक पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेला या वाढीचे श्रेय उद्योग तज्ज्ञ देतात.लखनौ येथील वरिष्ठ प्रवास नियोजक मोहन शर्मा यांनी अयोध्येचे वर्णन “भारतातील अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र” म्हणून केले आहे. धार्मिक पर्यटनाच्या बुकिंगमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. वाराणसीला ६२ दशलक्ष देशी पर्यटक आणि १,८४,००० आंतरराष्ट्रीय पर्यटक आलेत. तर भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत ८७,२२९ परदेशी पर्यटकांसह ६८ दशलक्ष पर्यटकानीं भेट दिली आहे.कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजला ४८ दशलक्ष पर्यटक आले आणि मिर्झापूरलाही ११.०८ दशलक्ष पर्यटक आले होते. तर ताजमहल आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे.