IND Vs ENG 5th Test:भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत  

0
IND Vs ENG 5th Test:भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत  
IND Vs ENG 5th Test:भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत  

IND Vs ENG 5th Test : भारत (India)आणि इंग्लंड (England) यांच्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रंगलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या (Test Cricket) मालिकेचा अखेर निर्णायक शेवट झाला. कर्णधार शुबमन गिल च्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाने मोठ्या दिग्गजांचा विक्रम मोडीत काढला आहे. केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय(A historic victory) मिळवत सामना ६ धावांनी जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे.

नक्की वाचा :  ‘सखुबाई’ गाण्यात गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा;’आतली बातमी फुटली’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित

मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा विजयाचे शिल्पकार (IND Vs ENG 5th Test)

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये पूर्ण जोर लावत इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हा सामना भारतीय संघाने ६ धावांनी जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे दोघेही भारतीय संघाच्या ओव्हल विजयाचे हिरो ठरले आहेत.

अवश्य वाचा :  मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?  

जो रूट आणि हॅरी ब्रुक यांच्या शतकांमुळे भारतीय संघाच्या हातून हा सामना पूर्णपणे निसटला होता. मात्र मोहम्मद सिराजला प्रसिद्ध कृष्णाची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून इंग्लंडच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवली. ब्रुक आणि रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज धावा करताना मोठा संघर्ष करताना दिसून आले. शेवटी एटकिंसन उभा राहिला. मात्र सिराजने त्याला बाद करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

भारतीय संघाची कामगिरी नेमकी कशी ? (IND Vs ENG 5th Test)

भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ २२४ धावांत आपला पहिला डाव गमावला. करुण नायरने ५७ धावा करत सर्वाधिक योगदान दिलं. साई सुदर्शन (३८) आणि वॉशिंग्टन सुंदर (२६) यांनीही काहीसा आधार दिला. इंग्लंडकडून गस ॲटकिन्सनने शानदार कामगिरी करत ५ बळी घेतले, तर जोश टंगला ३ आणि क्रिस वोक्सला १ बळी मिळाला.इंग्लंडने पहिल्या डावात २४७ धावा करत २३ धावांची आघाडी घेतली.दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने दमदार शतक ठोकले. त्याने १६४ चेंडूंमध्ये ११८ धावा केल्या. आकाश दीपने नाईटवॉचमन म्हणून येत ६६ धावांची झुंजार खेळी केली. जडेजा आणि सुंदरने प्रत्येकी ५३ धावा करत भारताचा डाव ३९६ पर्यंत पोहोचवला. इंग्लंडकडून जोश टंगने पुन्हा ५ विकेट घेतल्या.

रूट आणि ब्रूक यांच्यात चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंडला या सामन्यात पुनरागमन मिळाले. सलामीवीर बेन डकेटनेही ५४ धावांची उपयुक्त खेळी खेळली. सामन्यात ट्विस्ट चौथ्या दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात आला आणि भारतीय गोलंदाजाने हा विजय मिळवला.