IND vs ENG:दणदणीत विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री;इंग्लडला लोळवले 

T20 World Cup 2024 : टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ ची (T20  World Cup 2024) दुसरी सेमी फायनल भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडली. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

0
IND vs ENG: दणदणीत विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री;इंग्लडला लोळवले 
IND vs ENG: दणदणीत विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री;इंग्लडला लोळवले 

नगर : टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ ची (T20  World Cup 2024) दुसरी सेमी फायनल भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडली. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतानं इंग्लंडला १०३ धावांवर बाद करत ६८ धावांनी विजय मिळवला.

भारतानं रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ७ विकेटवर १७१ धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल, कुलदीप यादव,जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं  इंग्लंडला पराभूत केलं. भारतानं दिमाखात आता अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची शेवटची लढत होईल. या सामन्यात भारताने २०२२ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवची दमदार खेळी (IND vs ENG)

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच देखील उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं २० ओव्हरमध्ये ७ विकेटवर १७१ धावा केल्या. रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली.

अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहली याने टॉप्ली याला षटकार मारल्या नंतर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात ९ धावा काढून बाद झाला. रिषभ पंत देखील केवळ ४ धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भागिदारी केली.  रोहित शर्माने ५७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने देखील ४७ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने २३ धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र शिवम दुबे शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने १७  तर अक्षर पटेलने १० धावा केल्या. इंग्लंडकडून जॉर्डन याने ३ विकेट घेतल्या.

इंग्लंडची खेळी खराब (IND vs ENG)

अक्षर पटेलने जोस बटलर च्या रुपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. जसप्रीत बुमराह याने फिल सॉल्टला बाद करत दुसरा धक्का इंग्लंडला दिला. इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्षर पटेल याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद करून तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलच्या बॉलिंग वर इंग्लंडने आणखी एक विकेट गमावली. मोईन अली रिषभ पंतच्या सतर्कतेने यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने सॅम करनची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

हॅरी ब्रुक त्र एकदा जीवदान मिळून देखील कुलदीप यादव पुढे टिकू शकला नाही. कुलदीपने ब्रुक चा त्रिफळा उडवला. तसेच कुलदीप यादवने ख्रिस जॉर्डनला १ रनवर बाद करत  इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इंग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडची शेवटची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here