IND VS PAK:महिलांच्या भारत-पाकिस्तान सामन्यात काय घडलं ? खेळाडूंच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल  

0
IND VS PAK:महिलांच्या भारत-पाकिस्तान सामन्यात काय घडलं ? खेळाडूंच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल  

IND VS PAK : भारतीय पुरुष संघाने आशिया चषकात (Asia Cup) पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता भारताच्या महिला संघानेही वनडे विश्वचषक २०२५ मध्ये पाकिस्तानला ८८ धावांनी (INDW VS PAKW) पराभवाचा धक्का देत आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिल आहे. भारताचा पाकिस्तानविरूद्ध १२-० असा रेकॉर्डही कायम राहिलाय. या पराभवामुळे पाकिस्तानला गुणतालिकेत मोठा फटका बसलाय. तसेच या सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि पाकिस्तानची फिरकीपटू नश्रा संधू (Nashra Sandhu) यांचा एक व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झालाय.

नक्की वाचा: रोहित शर्माऐवजी शुबमन गिल करणार वनडे संघाचं नेतृत्व;बीसीसीआयची घोषणा  

सामन्यात काय घडलं ? (IND VS PAK)

भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या ६ व्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाला पराभवाची धूळ चारली. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८८ धावांनी विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे, तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भारताचा विजय सोपा केलाय. भारत आणि पाकिस्तान महिलांच्या या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावा करायच्या होत्या. मात्र,भारताच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर बाद झाला. भारत या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे.

अवश्य वाचा: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

हरमनप्रीत कौर व नशरा संधू यांचा विडिओ व्हायरल  (IND VS PAK)

या सामन्यात हरमनप्रीत कौर फलंदाजी करत असताना २२ व्या षटकांत पाकिस्तानकडून फिरकीपटू नशरा संधू गोलंदाजीसाठी आली. हरमनप्रीतने बॅटिंग केल्यानंतर तो बॉल गोलंदाजी करत असलेल्या नशरा संधूच्या हातात गेला. यावेळी नशरा संधूने तिला डोळे वटारुन पाहिले. यानंतर हरमनप्रीत देखील तिला प्रत्युत्तर देत तिच्याकडे बघत राहिली. सामन्यादरम्यान, पाकिस्तानी गोलंदाज नश्रा संधूने हरमनप्रीतला उकसावण्याचा प्रयत्न केला, परंतु हरमनप्रीत तिच्या जागेवर मैदानात शांतपणे उभी राहिली आणि तिच्याकडे शेवटपर्यंत तीक्ष्ण नजरेने पाहत राहिली. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here