India : पाथर्डी : भारत (India) देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी अनेक विदेशी शक्ती घुबाडावाणी घोंगावत आहेत, अशी घणाघाती टीका गोविंद देवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी केली. पाथर्डी (Pathardi) शहरातून अयोध्या (Ayodhya) येथील राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांची शिव चैतन्य जागरण शोभा यात्रा काढण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
नक्की वाचा: शिर्डी प्रमाणेच संगमनेरचा विकास आपल्याला करायचा आहे : विखे पाटील
शिव चैतन्य जागरण शोभायात्रा
पाथर्डी शहरातून शिव चैतन्य जागरण शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी अजंठा चौक या ठिकाणी देवगिरी महाराज यांनी उपस्थितीत बांधवांना मार्गदर्शन केले. शेवगाव रोड येथील अर्जुना लॉन्स या ठिकाणावरून शोभायात्रे दरम्यान रथातून गोविंद देवगिरी महाराज, प्रज्ञाचक्षु मुकुंद जाटदेवळेकर, राम महाराज झिंजुर्के, गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो मोटरसायकलसह हजारो हिंदू बांधवांसह आमदार मोनिका राजळे, हिंदू रक्षा युवा मंच, नागरिक, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. रथामध्ये विराजमान झालेल्या साधुसंतावर मोठया प्रमाणात फुलांची उधळण करून ठिकठिकाणी स्वागत केले.औक्षण, रस्त्यावर रांगोळी,सडे, पुष्पृष्टी अशा पद्धतीने पाथर्डीतून शोभायात्रा काढण्यात आली.सगळीकडे जय श्रीरामचा नारा यावेळी गर्जत होता.
अवश्य वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?
गोविंद देवगिरी म्हणाले, (India)
मी पाथर्डी शहरात भाषण केले आणि दुसऱ्याच दिवशी राम मंदिराचे कुलूप उघडले. पाथर्डीत घेतलेल्या संकल्पाची पूर्तता झाल्यामुळे हे शहर मला नेहमी आठवते. राष्ट्र, धर्म,संस्कृतीच्या संरक्षणाचे काम, कसे व कशासाठी करावे हे सर्व आपल्याला कळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आपल्या अंतकरणात झाली पाहिजे. छत्रपतींचे विचार आपल्यात नवचैतन्य निर्माण करणारे आहेत.या शोभायात्रेसाठी मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.