India | नगर : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज (ता. ८) भारत (India) विरुद्ध न्यूझीलँड यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलँडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्थेत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या पराभवामुळे न्यूझीलँडचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
नक्की वाचा : अक्षय कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; कारवाईची मागणी
नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलँड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. संजीव सॅमसंग व अभिषेक शर्माने मैदानाच्या चौफेर चौकार व षटकारांची आतषबाजी केली. या माऱ्यासमोर न्यूझीलँडचे गोलंदाजीची दिशा भरकटली. दोन्ही सलामीवीरांनी सात षटकांत ९८ धावांची भागीदारी नोंदवली. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ५२ धावा करून झेलबाद झाल्यानंतर ही जोडी फुटली. त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशनने मोर्चा संभाळला. दोन्ही फलंदाजांनी चक्क १०५ धावांची भागीदारी करत न्यूझीलँडच्या विजयाच्या आशा धुसर केल्या. संजीव सॅमसंगने ४६ चेंडूत ८९ धावा तर इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. भारतीय संघाने २० षटकांत पाच गडी गमावत २५५ धावांचा डोंगर तयार केला.
अवश्य वाचा : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
भारताची भेदक गोलंदाजी
२५६ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलँडचे फलंदाज दबावात दिसले. त्यांचा संपूर्ण संघ १९ षटके खेळत १५९ धावाच जमवू शकला. भारताकडून जसप्रित बुमराने चार, अक्षर पटेलने तीन फलंदाज तर हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती व अभिषेक शर्माने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.



