India Alliance : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

India Alliance : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

0
India Alliance

India Alliance : नगर : कांदा तसेच शेतमालाच्या हमीभावासाठी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासह इंडिया आघाडीच्या (India Alliance) खासदारांनी संसदेच्या (Parliament) प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले. कांद्याला (Onion) हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली..

अवश्य वाचा: “आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम

सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी (India Alliance)

यावेळी सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. नीलेश लंके यांनी केले.

नक्की वाचा: कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; एकजण ठार

इंडिया आघाडीच्या खासदारांचा आंदोलनात सहभाग (India Alliance)

आंदोलनात माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरूजी, शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी हे सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टी डी पी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्‍नावर जोरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here