india vs afghanistan : भारताचा अफगाणिस्तानवर ८ गडी राखून विजय

भारतीय संघाने ८ गडी व ९० चेंडू राखून सहज विजय मिळविला

0

नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज भारत (India) व अफगाणिस्तान (Afghanistan) या संघांत साखळी सामना झाला. यात भारतीय संघाने ८ गडी व ९० चेंडू राखून सहज विजय मिळविला. ८४ चेंडूंत १३१ धावांची तडाखेबाज खेळी करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा सामनावीराचा मानकरी ठरला.


अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्थानचा संघ ५० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा जमवू शकला. कर्णधार हश्मातुल्लाह शहिदीने सर्वाधिक ८० धावा केल्या. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार फलंदाज बाद केले.


२७३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ठोस सुरुवात केली. रोहित शर्माने १३१, इशान किशनने ४७ व विराट कोहलीने नाबाद ५५ धावा केल्या. भारतीय संघाने ३५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य साध्य केले. रोहित शर्माने १६ चौकार व पाच षटकार लगावले. अफगाणिस्तान रशिद खानने दोन फलंदाज बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here