India LPG Crisis Update: देशातील पेट्रोल-डिझेल,एलपीजीचा साठा किती दिवस पुरणार? सरकारने दिले स्पष्टीकरण

0
India LPG Crisis Update: देशातील पेट्रोल-डिझेल,एलपीजीचा साठा किती दिवस पुरणार? सरकारने दिले स्पष्टीकरण
India LPG Crisis Update: देशातील पेट्रोल-डिझेल,एलपीजीचा साठा किती दिवस पुरणार? सरकारने दिले स्पष्टीकरण

नगर : अमेरिका,इराण आणि इस्राईल या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाई (Shortage of petrol, diesel, and LPG) जाणवत आहे. या चर्चा  सुरू असताना केंद्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) सांगितले आहे की, देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही सरकारने दिली.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा हप्ता झाला मंजूर, फेब्रुवारीचा हफ्ता ‘या’ दिवशी मिळणार

इंधन साठा सुरक्षित (India LPG Crisis Update)

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही. सरकारने दिलेल्या इशाऱ्यानुसार, काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.

अवश्य वाचा: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक

नागरिकांना सरकारचे आवाहन (India LPG Crisis Update)

मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा घबराट करण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं चित्र आहे. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आहे.  त्यातच, युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारकडून राज्यांसाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील शिधापत्रिका धारकांना ३ लिटर रॉकेल मिळणार आहे.