India-Pakistan : नगर : आशिया कपच्या (Asia Cup 2025) 41 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान (India-Pakistan) फायनलमध्ये (Final) भिडणार आहेत. तर यावर्षीच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा परस्परांशी भिडणार असून मागील दोनही सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.
अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे
अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची पहिलीच वेळ
आशिया कप पहिल्यांदा 1984 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून 17 हंगाम खेळले गेले आहेत. 1984 ते 2025 दरम्यान 41 वर्षांचे अंतर आहे. तथापि, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 25 सप्टेंबर रोजी सुपर 4 सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला हरवून भारताविरुद्ध अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तथापि, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच असा अंदाज होता की अंतिम सामना दोन्ही देशांमध्ये होईल.
नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक
हायहोल्टेज सामना बघण्याची उत्सुकता शिगेला (India-Pakistan)
भारताने या स्पर्धेचा अंतिम सामना आठ वेळा जिंकला आहे. यामध्ये 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 ही वर्षे समाविष्ट आहेत. 2016 मध्ये आशिया कप टी-20 स्वरूपात सुरु झाला. दोन्ही देश कधीही अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले नाही. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये फक्त दोनदाच हा चषक जिंकला आहे. श्रीलंकेने ही स्पर्धा सहा वेळा जिंकली आहे. भारतीय संघ आशिया कप जिंकण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. आशिया चषक 2025 मध्ये दोनवेळा भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे हा हायहोल्टेज सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.