India-Pakistan War : नगर : भारत-पाकिस्तान युद्ध (India-Pakistan War) सुरु आहे. चुकीची माहिती (Misinformation) पसरविल्यास तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरविल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी केले आहे.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
जातीय भावना दुखावतील अशा टिप्पणी करू नका
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त सरकारी अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा. कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा टिप्पणी करू नका, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, किंवा अज्ञात स्रोतांवर येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका. जर तुम्हाला संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसली, तर त्वरित पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाला कळवा.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करा (India-Pakistan War)
कोणत्याही प्रकारची अनोळखी एपीके फाईल, लिंक, ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य, सायबर अटॅक असू शकते, त्यामुळे शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. तसेच सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा असून देशाची युद्ध तयारीची माहिती दुश्मन राष्ट्राला होऊ शकते यामुळे, असे चित्रीकरण कोणी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.