India-Pakistan War : अहिल्यानगर : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) 7 मे रोजी भारताने एअर स्ट्राईक (Air Strike) केला होता. यानंतर भारत-पाकिस्तान यद्धास (India-Pakistan War) सुरुवात झाली, अखेर या युद्ध कारवाईला विराम मिळाला आहे. अमेरिकेच्या (America) मध्यस्थीनंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
सायंकाळी 5 वा. भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा
एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे हे हल्ले नेतस्तनाबूत केले. त्यानंतर, दोन्ही देशातील तणाव अधिकच वाढला होता. एकीकडे सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत होता. दुसरीकडे हवाई हल्लेदेखील सुरू होते. अखेर, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
पाकिस्तानकडून 3.35 वाजता आला फोन (India-Pakistan War)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की पाकिस्तानकडून 3.35 वाजता फोन आला, त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करुन युद्धविरामाची माहिती दिली. तसेच, दहशतवादाविरूद्धची भारताची भूमिका आजही कायम असल्याचे पाकिस्तानला ठणकावलं आहे.