
नगर : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakisitan War) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.आता देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पोलिसांनी सुरक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार,लाल किल्ला (Red Fort) आणि कुतुबमिनारसह (Qutub Minar)राजधानीतील ऐतिहासिक इमारती आणि इतर इमारतींची सुरक्षा (Building security) वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील लोकांची, सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांची कार्यालये, ऐतिहासिक इमारती आणि इतर आस्थापनांची सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार
लाल किल्ला, कुतुब मिनारजवळ पोलीस दल तैनात (India Paksitan War)
या निर्णयाअंतर्गत, दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला, कुतुबमिनारजवळ पोलीस दल तैनात केलं आहे. ऐतिहासिक इमारतींजवळ मोठ्या संख्येने लोक जमत असल्याने, खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून जोरदार गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव अधिक वाढला आहे. पाकिस्तानकडूनही ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी प्रशासनाने ही खबरदारी घेतल्याचं चित्र आहे.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ (India Paksitan War)
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकही मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे. तसेच भाविकांना जास्त वेळ मंदिरात थांबू दिले जात नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन रजा रद्द (India Paksitan War)
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने देशांतर्गत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागातील सर्व अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन रजा रद्द करण्यात आल्या आहेत,असे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यांच्या वतीने काढण्यात आले आहेत.आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वैद्यकीय विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासू शकते आणि हीच गरज लक्षात घेता सध्या दीर्घकालीन सुट्टीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर रुजू होण्यासाठी सूचना द्याव्यात, त्याचबरोबर दीर्घकालीन रजा आता मंजूर करू नये,असे आदेश काढण्यात आले आहेत.