India Test captain:रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार

0
India Test captain:रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर 'हा' खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार
India Test captain:रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर 'हा' खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार

India Test captain : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने काल (ता.७) कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती (Retirement) घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट (One day Cricket) खेळत राहणार असल्याचं देखील रोहितने स्पष्ट केले. रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार (Test cricket captain) कोण होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नक्की वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ 

निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा काय म्हणाला? (India Test captain)

इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, ‘सर्वांना नमस्कार. मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.

अवश्य वाचा : ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 

शुभमन गिल कसोटी क्रिकेटचा कर्णधार होणार  (India Test captain)

रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार कोण होणार? याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या कसोटी कर्णधार पदासाठी भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याचं नाव निश्चित मानलं जात आहे. शुभमन गिल कसोटी क्रिकेटचा कर्णधार होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा या बैठकीत नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल. शुभमन गिलसह जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे कर्णधार पदाच्या शर्यतीत होते.अखेर शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. निवड समितीच्या मते २५ वर्षीय गिल हा कसोटी कर्णधार होण्यासाठी आदर्श उमेदवार आहे,असे त्यांचे मत आहे.औपचारिक घोषणा करण्यापूर्वी निवड समिती बीसीसीआयशी यावर चर्चा करेल. जर गिलला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले तर त्याची पहिली कामगिरी इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल.