India Vs Australia World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांची भविष्यवाणी

विश्वचषक आता आपलाच असणार याची मला १००% खात्री आहे', अशी भविष्यवाणी रजनीकांत यांनी केली.

0

नगर : विश्वचषक २०२३ मध्ये तुफान कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या विश्वचषकाच्या फायनल सामन्याकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. या सामन्याबाबत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

नक्की पहा : ‘मराठा नेत्यांचा पाठिंबा मिळाला तर दोन तासांत आरक्षण मिळेल’ – जरांगे

भारत विरुद्ध न्यूझीलंड या वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत भारतीयांची मने जिंकली होती. हा सामना पाहण्यासाठी राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी,रणबीर कपूरसह सुपरस्टार रजनीकांत यांची देखील उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी रजनीकांत खास चैन्नईहून मुंबईला आले होते.

अवश्य वाचा :  ऑस्ट्रेलिया अंतिमफेरीत दाखल; भारताविरुद्ध ‘फायनल

यावेळी सुपरस्टार रजनीकांत म्हणाले की, ‘भारत न्यूझीलंडची मॅच सुरू असताना सुरुवातीला मला अस्वस्थ वाटलं. पण नंतर विकेट पडल्या  तेव्हा मला आनंद होत गेला. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो. पण विश्वचषक आता आपलाच असणार याची मला १००% खात्री आहे’, अशी भविष्यवाणी त्यांनी यावेळी केली. रजनीकांत यांचा ‘थलायवा १७१’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २० वर्षानंतर भिडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये रविवारी होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.