India Vs Namibia : टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता

India Vs Namibia : टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता

0
India Vs Namibia : टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता
India Vs Namibia : टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता

India Vs Namibia : नगर : टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) आज दिल्लीतील अरुण जेटली मैदानात भारत आणि नामिबिया (India Vs Namibia) यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नामिबियाविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) खेळण्याबाबत साशंकता आहे. तर सराव करताना इशान किशनला (Ishan Kishan) दुखापत झाल्याने त्यालाही आजच्या सामन्यातून विश्रांती देण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी

भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर

पोटात संसर्ग झाल्याने अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला सल्याची माहिती तिलक वर्मा याने दिली आहे. अभिषेक शर्माची प्रकृती सामन्याच्या वेळी कशी असेल, त्याला सामन्यात संधी देणार आहे की नाही अजून ठरणार असल्याचं वर्मानं म्हटलं आहे. दरम्यान, भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. तर दोन सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला असल्याने ते 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात नामिबियाला पराभूत करुन टीम इंडियाला पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे.

अवश्य वाचा: कॉपी मुक्त परीक्षेच्या केवळ घोषणाच; अहिल्यानगरमध्ये आढळले ९ कॉपी बहाद्दर

अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India Vs Namibia)

संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह