India Vs Zimbabwe : नगर : शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वातील युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेची धूळदाण उडवली. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा (India Vs Zimbabwe) 23 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) पाच सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भेदक मारा कऱणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला सामनावीर (Man of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले. सुंदरने 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.
अवश्य वाचा: सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण; दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी हजर…
टीम इंडियाची 182 धावांपर्यंत मजल
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले, त्याने 49 धावांची खेळी खेळली. यशस्वी जैस्वालनेही 36 धावा करत टीम इंडियाला 182 धावांपर्यंत मजल मारली.
नक्की वाचा: नगरसह विविध शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
झिम्बाब्वेने 39 धावांत गमावल्या 5 विकेट
भारताने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यातून यजमान सावरलेच नाहीत. यजमान झिम्बाब्वेने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला वेस्ली माधवेरे केवळ 1 धावा काढून बाद झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण विजय मिळवून देऊ शकला नाही. रझा फक्त 15 धावा काढून बाद झाला.