नगर : भारताने आतापर्यंत अंतराळ संशोधनातील अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले आहे. आता भारताचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ (Bharat Antariksha Station) बांधण्यात येणार आहे. या अंतराळ स्थानकाला देण्यात येणारी अंतिम मंजुरी आणि अभियांत्रिकी टप्प्यात असून २०३५ पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे निधन
काय म्हणाले अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह…(Space Station)
दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना विज्ञान मंत्रालयांच्या कामगिरीवर सिंग यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांवर प्रकाश टाकला.“आमचे स्वतःचे अंतराळ स्थानक असणार आहे, अमेरिका आणि एक-दोन देशांनंतर भारताचं स्थानक असेल. २०३५ पर्यंत ते भारत अंतरीक्षा स्थानक म्हणून ओळखले जाईल आणि २०४० पर्यंत,आम्ही कदाचित चंद्रावर लँडिंग करू,असं त्यांनी सांगितलं.
अवश्य वाचा : अभिनेत्री शिवाली परबच्या ‘मंगला’ चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार सिनेमा भेटीला
“२०२४ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे,असंही त्यांनी सांगितलं. तसंच,भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून ६ हजार मीटरपर्यंत खोली शोधून समुद्रतळावर मानव पाठवण्याची ही योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंतराळ स्थानकाची निर्मिती का? (Space Station)
२०३० च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे.त्यामुळे भारतीय अंतराळ स्थानक आपल्या देशाला जागतिक लाभ देऊ शकतो. भारताचे अंतराळ स्थानक पाश्चिमात्य देशांमधील आमच्या मित्रराष्ट्रांना जागतिक संशोधन सहकार्यासाठी अवलंबून राहण्यासाठी एक महत्त्वाचे संसाधन प्रदान करेल,असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.‘बीएएस’ पूर्णपणे स्वदेशी अभियांत्रिकीसह तयार केले जात आहे, परंतु गरजेनुसार संभाव्य जागतिक सहकार्याचा पर्याय भारताने खुला ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था बंद होणार असल्याने ‘बीएएस’ अग्रगण्य व्यासपीठ म्हणून उदयास येईल,असा विश्वास संशोधकांना आहे.