India Young Leaders 2025 : सोनईच्या श्रेयस झरकरची विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५ – महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून निवड

India Young Leaders 2025 : सोनईच्या श्रेयस झरकरची विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५ - महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून निवड

0

India Young Leaders 2025 : नगर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत १०-१२ जानेवारी रोजी भारत मंडपम येथे झालेल्या विकसित भारत यंग लीडर्स २०२५ (India Young Leaders 2025) मध्ये नेवासा तालुक्यातील सोनई येथील श्रेयस झरकर याने महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रतिनिधीत्व केले.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्याचे कौतुक

श्रेयस हा नेहमीच शासकीय उपक्रमांतही मोठ्या हिरीरीने सहभागी होत असतो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी त्याने “लोकशाहीचे जनजागरण” व्हिडिओ मालिका तयार केली होती. त्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्याचे कौतुक केले होते.

India Young Leaders 2025 : सोनईच्या श्रेयस झरकरची विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५ - महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून निवड
India Young Leaders 2025 : सोनईच्या श्रेयस झरकरची विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५ – महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून निवड

अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’

‘लोकशाहीचे जनजागरण’ ही व्हिडीओ मालिका (India Young Leaders 2025)

श्रेयस याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘लोकशाहीचे जनजागरण’ ही व्हिडीओ मालिका तयार केली होती. या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले होते. या व्हिडीओ मालिकेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत निवडणूक आयोगाच्या अभ्यासपूर्ण माहितीमधून लोकशाहीचे जनजागरण ही व्हिडीओ मालिका तयार केली आहे. ही मालिका विविध भागांमध्ये तयार करण्यात आली असून, यामध्ये लोकशाहीची दवंडी, उत्साही नवमतदार, लोकशाहीसाठी मतदान का महत्त्वाचे आहे?, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन म्हणजे काय ? १९५० मतदार तक्रार निवारण क्रमांक, भारत निवडणूक आयोगाचे विविध मोबाइल ॲप्लिकेशन्स ज्या मध्ये केवायसी ॲप, सी-व्हिजील ॲप (आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार करण्यासाठी), वोटर हेल्पलाइन ॲप (मतदार सुविधा) या भागांचा समावेश आहे. ही मालिका तयार करण्यासाठी श्रेयस याला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांचे मार्गदर्शन मिळाले होते.