Indian Railway Rules : भारतीय रेल्वे (Indian Railway) १ जुलै २०२५ पासून काही मोठे बदल (Rule Changes) लागू करणार आहे. ज्याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांवर होणार आहे. तात्काळ तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने आधार पडताळणी (Aadhaar Verification) आणि ओटीपी सिस्टीम लागू केली आहे. भारतीय रेल्वे आता प्रवासाच्या आठ तास आधीच चार्ट तयार करण्यास सुरुवात करणार आहे. ज्यामुळे सामान्य प्रवाशांना वेळेवर तिकिटे आणि जागा मिळू शकतील.
नक्की वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी;शिर्डीतील सर्व दुकानांसाठी आता एकच दरपत्रक
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा युपीआय सारखे डिजिटल पेमेंट वापरत असाल तर हे नवीन नियम जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. एसी तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीची मर्यादा एकूण जागांच्या ६०% पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोणते नवीन बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊयात.
अवश्य वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका
१ जुलैपासून रेल्वे भाडे वाढणार (Indian Railway Rules)
भारतीय रेल्वे १ जुलैपासून प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ करणार आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी, नॉन-एसी गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने वाढेल, तर एसी वर्गातील भाडे प्रति किलोमीटर २ पैशाने वाढणार आहे. ५०० किमी पर्यंतच्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तर ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी, भाडे प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त वाढू शकते.
२. ओटीपी पडताळणी अनिवार्य (Indian Railway Rules)
आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारकार्ड आधारित ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. १ जुलै २०२५ पासून वापरकर्त्यांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपवर तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक लिंक करावा लागेल. तसेच १५ जुलै २०२५ पासून प्रत्येक बुकिंगसाठी अतिरिक्त आधार ओटीपी पडताळणी प्रक्रिया सुरू होईल. तिकिटांचा काळाबाजार आणि बनावट बुकिंग रोखण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. जर तुम्ही अजूनही आधार लिंक केलं नसेल, तर ३० जूनपर्यंत आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देऊन ते करा.
३. प्रतीक्षा यादीतील तिकिटात बदल (Indian Railway Rules)
एसी कोचसाठी वेटिंग लिस्ट तिकिटांची मर्यादा २५% वरून ६०% पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा बदल आज १ जुलै २०२५ पासून लागू झालं आहे. जेणेकरून अधिकाधिक प्रवासी प्रवास करू शकतील. जर एसी कोचमध्ये ५० जागा असतील तर पूर्वी फक्त १२ वेटिंग तिकिटे उपलब्ध होती, मात्र आता ३० तिकिटे उपलब्ध होऊ शकतात. हा बदल प्रवाशांसाठी दिलासा देणारा आहे. परंतु, कन्फर्म सीटची हमी कमी होऊ शकते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाड्यांचा चांगला वापर करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
४. रिझर्वेशन चार्टमध्ये मोठे बदल (Indian Railway Rules)
आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधीच ट्रेन चार्ट तयार केला जाईल. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना जागा मिळाली आहे की नाही याची वेळेवर माहिती मिळेल. पूर्वी हा चार्ट फक्त ४ तास आधी तयार केला जात होता. पहाटे २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत अंतिम केला जाणार आहे.