नगर : भारत आणि पाकिस्तान (Bharat And Pakistan) यांच्यात टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) अजून एक चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत नव्हता. मात्र अखेरच्या षटकात भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ६ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांनी अप्रतिम खेळी केली. त्याचबरोबर संपूर्ण संघाने क्षेत्ररक्षण करताना चांगली कामगिरी केली. पाकिस्तानविरूद्ध विजयाची नोंद करून टीम इंडियाने एक मोठा विक्रम केला आहे. हा सामना न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाला.
नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती’-देवेंद्र फडणवीस
भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी (IND vs PAK)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा केल्या होत्या. भारताकडून फक्त ऋषभ पंत चांगली फलंदाजी करू शकला. त्याने ४२ धावांची शानदार खेळी खेळली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाने १० षटकांत १ गडी गमावून ५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळवणे कठीण वाटत होते.मात्र भारतीय गोलंदाजांमुळे टीम इंडियाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
अवश्य वाचा : रामोजी फिल्म सिटी वसवणारे रामोजी राव काळाच्या पडद्याआड
जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर (IND vs PAK)
जसप्रीत बुमराहने शानदारी गोलंदाजी करत पाकिस्तान संघाच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवलं. शेवटच्या दोन षटकांत बुमराहने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता. भारताने दिलेल्या १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ७ गडी गमावत ११३ धावाच करू शकला. या सामन्यात गोलंदाजी करताना जसप्रीतन बुमराहाने ४ षटकात १४ धावा देत ३ बळी घेतले.बुमराहची ही चमकदार कामगिरी पाहून त्याला सामनावीर म्हणून ही निवडण्यात आले. टी२० विश्वचषकाचा हा १९ वा सामना होता. या सामन्यात हार्दिक पांड्याने दोन विकेट. तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल एक-एक विकेट घेण्यात यशस्वी झाले.
भारतीय संघाने पाकिस्तानसमोर १२० धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला. याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने इतक्या लहान धावसंख्येचा बचाव केला नव्हता. टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान संघांमधील हा ८ वा सामना होता. यादरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत विक्रमी ७वा विजय मिळवला. यासह टीम इंडिया टी-२० विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे