नगर : देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं (UnderWater Metro) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं आहे. कोलकाताच्या हुगळी नदीमधील (Hugali River) बोगद्यातून ही मेट्रो सुसाट धावणार आहे.
नक्की वाचा : आता ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा; भारत सरकारकडून ‘चक्षु’ पोर्टल लॉन्च
मोदींनी केला अंडरवॉटर मेट्रोतून प्रवास (PM Modi)
ही पाण्याखालील मेट्रो बोगदा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागा दरम्यान धावेल. कोलकाता मेट्रो हावडा मैदान-एस्प्लेनेड बोगदा हा भारतातील कोणत्याही नदीखाली बांधला जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे. कोलकाताची पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीखाली बांधण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला होता आणि आज पंतप्रधान मोदींनी पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचं लोकार्पण केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यातून प्रवासही केला आहे. अंडरवॉटर मेट्रोतुन प्रवास करताना शालेय विद्यार्थ्यांशी संवादही साधला आहे.
अवश्य वाचा : अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर ; ‘इंद्रायणी’ च्या शीर्षक गीताला प्रेक्षकांची पसंती
पंतप्रधानांकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा (PM Modi)
नरेंद्र मोदींनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमिपूजन केले आहे. याबरोबरच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.