Koneru Humpy:आनंदवार्ता!भारताच्या कोनेरू हम्पीने मिळविले जागतिक रॅपिड बुद्धिबळचे विजेतेपद!

0
Koneru Humpy:आनंदवार्ता! भारताच्या कोनेरू हम्पीने मिळविले जागतिक रॅपिड बुद्धिबळचे विजेतेपद!
Koneru Humpy:आनंदवार्ता! भारताच्या कोनेरू हम्पीने मिळविले जागतिक रॅपिड बुद्धिबळचे विजेतेपद!

नगर : क्रीडा विश्वात भारताने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने (Koneru Humpy)रविवारी (ता.२९) इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला नमवत दुसऱ्यांदा जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे (Dynamic Rapid Chess Championship) जेतेपद (Winner) मिळवले. हम्पीने २०१९ मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले होते. भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू चीनच्या जू वेन्जूननंतर एकहून अधिक जेतेपद मिळवणारी दुसरी बुद्धिबळपटू ठरली. ३७ वर्षीय हम्पीने संभावित ११ पैकी ८.५ गुणांची कमाई केली.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री  

कोनेरू हम्पीचे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन (Koneru Humpy)

कोनेरू हम्पीमुळे भारतीय बुद्धिबळासाठी २०२४ हे वर्ष संस्मरणीय राहिले. याआधी डी. गुकेशने सिंगापूरमध्ये पारंपरिक प्रारूपातील जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला नमवत जगज्जेतेपद मिळवले. सप्टेंबरमध्ये भारताने बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच खुल्या व महिला गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यानंतर हम्पीने केलेली कामगिरी आनंदाची बाब ठरली आहे. कोनेरू हम्पी ही नेहमीच वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करते. तिने मॉस्को येथे २०१२ रोजी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य तर २०२३ मध्ये उज्बेकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकेल होते. कोनेरू हम्पी हिचे वडील अशोक हम्पी हे देखील बुद्धिबळपटू होते. कोनेरूला तिच्या वडिलांनीच बुद्धिबळाची ट्रेनिंग दिलेली आहे.

अवश्य वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर निधन  

काय म्हणाली कोनेरू हम्पी?  (Koneru Humpy)

कोनेरू हम्पीने केलेल्या कामगिरीचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले. ती म्हणाली,‘‘माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली. जेव्हा मी स्पर्धेसाठी प्रवास करते.तेव्हा माझे आई-वडील मुलीची काळजी घेतात. ३७व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवणे सोपे नाही. जेव्हा तुमचे वय वाढत असते, तेव्हा लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे असते. मी हे करू शकले यात समाधान आहे. पहिल्या फेरीतील पराभवानंतर हम्पी जेतेपदाचा विचार करत नव्हती. सलग चार फेऱ्या जिंकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने मदत मिळाली.’’  वेळेच्या फरकामुळे काही गोष्टींचे आव्हान होते. मला येथे पुरेशी झोप मिळत नव्हती. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी केल्याने मी आनंदी आहे,’’ असे हम्पीने सांगितले.ती पुढे म्हणाली की,‘‘ भारतासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्याकडे जगज्जेता म्हणून गुकेश आहे.आता मला जलद प्रारूपात दुसरे जेतेपद मिळाले आहे. त्यामुळे अनेक युवा व्यावसायिक बुद्धिबळ खेळण्यास प्रेरित होतील, असे मला वाटते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here