नगर : मागील एक आठवड्यापासून इंडिगोची विमानसेवा (Indigo Airlines) कोलमडली होती. अनेक ठिकाणी इंडिगोच्या विमानांचं उड्डाण रद्द (Flights cancelled) झालं होतं, तर काही ठिकाणी विमानांच्या उड्डाणाला विलंब होत होता. त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर झालेल्या या प्रकाराबाबत इंडिगोने माफी मागितली होती. सध्या इंडिगोच्या गोंधळाची परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.विमानाच्या गोंधळानंतर इंडिगोने आज प्रवाशांसाठी पहिलाच एक मोठा निर्णय (A major Decision For Passengers) घेतला आहे.
नक्की वाचा: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
प्रवाशांना मिळणार १० हजार रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर (Indigo Flight)

विमानाच्या गोंधळामुळे सर्वाधिक त्रास झालेल्या प्रवाशांना १० हजार रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची घोषणा इंडिगोकडून करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अचानक रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सरकारी निर्देशानुसार रद्द केलेल्या विमानांसाठी ५ ते १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त भरपाई प्रवाशांना दिली जाणार आहे, अशी माहिती इंडिगोने एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
इंडिगोने निवेदनात नेमकं काय? (Indigo Flight)
इंडिगोच्या निवेदनात म्हटलं आहे की, “ग्राहकांची काळजी घेणं हे आमचं प्राधान्य आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या अडचणीनंतर रद्द झालेल्या विमानांसाठी आता प्रवाशांना सर्व परतावे देण्यात येत आहेत. आम्हाला देखील हे मान्य करावं लागेल की ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२५ रोजी आमचे काही ग्राहक अनेक विमानतळांवर अडकून पडले होते. त्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आमच्या अडचणींमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी आम्ही १० हजार रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर देणार आहोत. हे ट्रॅव्हल व्हाउचर पुढील एका वर्षांसाठी कोणत्याही भविष्यातील इंडिगोच्या प्रवासासाठी प्रवाशांना ते वापरता येणार आहे.



