Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

नगर : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर न्यायालयाने दिलासा देत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे.

0
इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

नगर : प्रसिद्ध किर्तनकार व समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारण संगमनेर न्यायालयाने इंदुरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन (Bail) मंजूर केला आहे. त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नक्की वाचा : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता

इंदुरीकर यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता.२४) नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणीच्या एक दिवस आधीच त्यांनी स्वतः न्यायालयात हजर राहत जामीन घेतला आहे. २४ तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने त्यांनी या अर्जावर सुनावणी करण्यासाठी विनंती केली होती. न्यायालयाने त्यांच्या विनंतीला मान देत जामीन मंजूर केला आहे. इंदुरीकरांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे, इंदुरीकर यांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.  

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा

अपत्य प्राप्तीबाबत  इंदुरीकर महाराज यांनी २०२० मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळेच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी देखील इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने इंदुरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर इंदुरीकर महाराजांना दिलासा देत संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here