Indurikar Maharaj:’धर्माचं भांडवल करु नका’,इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी 

0
Indurikar Maharaj:'धर्माचं भांडवल करु नका',इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी 
Indurikar Maharaj:'धर्माचं भांडवल करु नका',इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी 

नगर : ‘धर्मांचं भांडवल करु नका’,असं म्हणत प्रसिद्ध समाजप्रबोधनकार आणि प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी राजकारण्यांना खडे बोल (Expostulation) सुनावले आहेत. किर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनांमधून ते प्रबोधनाचं कार्य करतात. यूट्यूबवर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळेस त्यांनी राजकारण्यांची कानउघाडणी केली आहे.

नक्की वाचा : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली माहिती    

‘आतापर्यंत गरीबांचीच लेकरं आत गेलीत,मोठ्यांची नाही’ (Indurikar Maharaj)

इंदुरीकर महाराज म्हणाले की, “तरुणांनो एक गोष्ट सांगतो तुम्ही या दंगली बिंगलींमध्ये पडू नका. माझ्या इतकी किर्तनं महाराष्ट्रात अजून कुणी केली नाहीत. मी अनुभवावरून सांगतो आहे. मी ८० किर्तनांच्या खाली महिना काढत नाहीत. माझी वाक्यं फक्त पुस्तकांतली नाहीत, तर अनुभवांमधून आलेली आहेत. आत्तापर्यंत लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत.जर दंगली बिंगलीत दिसले तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच लेकरं आत गेली आहेत. मोठ्यांचे कधीही आत गेले नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळतळीने सांगतो आहे”,असं त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी!आता फक्त ९९ रुपयांना मिळणार आवडीचा ब्रँड
महाराज पुढे म्हणाले की, धर्माचा अभिमान नाही का ? असं कुणी तुम्हाला विचारलं तर त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे. आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. सगळे पोलीस तुम्हाला सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरीफिकेशन शिवाय होत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका” असं त्यांनी सांगितले.

‘४० टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झालीत’ (Indurikar Maharaj)

४० टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत. आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालं. आपण कापूस ५०० क्विंटल विकला दोन कोटी आले तर लगेच दोन कोटी कुठून आले ? याची चौकशी होते. आता काय करायचं बोला? फेअर अँड लव्हली लावून जर माणसं गोरी झाली असती मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? समाज मारायचा आहे  विचार करु द्यायचा नाही, अशा गोष्टी चालली आहे. ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला ते नोकरी देऊ म्हणतात. युज अँड थ्रो सारखं ज्यांनी पोरांना वापरलं आहे. मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे त्याची आठवण येईल. पण फरक काही पडणार नाही, असाही टोला इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here