‘Infinite’ Investment Scam : ‘इन्फिनाईट’ गुंतवणूक घोटाळा; दोन एजंट गजाआड, तीन दिवसांची पोलीस कोठडी

'Infinite' Investment Scam : 'इन्फिनाईट' गुंतवणूक घोटाळा; दोन एजंट गजाआड, तीन दिवसांची पोलीस कोठडी

0
'Infinite' Investment Scam : 'इन्फिनाईट' गुंतवणूक घोटाळा; दोन एजंट गजाआड, तीन दिवसांची पोलीस कोठडी
'Infinite' Investment Scam : 'इन्फिनाईट' गुंतवणूक घोटाळा; दोन एजंट गजाआड, तीन दिवसांची पोलीस कोठडी

‘Infinite’ Investment Scam : नगर : इन्फिनाईट बिकन (‘Infinite’ Investment Scam), ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट, सिस्पे आदी कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात (Fraud) श्रीगोंदा, तोफखाना व सुपा पोलीस ठाण्यांत (Supa Police Station) गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोघा एजंटांना आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offences Wing) पोलिसांनी सोमवारी (ता. ३) पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. अंबादास जाधव (वय ५०, रा. दरेवाडी, ता. अहिल्यानगर) व बाळासाहेब हिंगे (वय ४५, रा. दहिगाव साकत) अशी अटक केलेल्या एजंटांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात एक कोटी ६९ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक झाल्याची नोंद असून शिक्षिका अनामिका शिंदे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जाधव आणि हिंगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीला इन्फिनाईट बिकन व ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुंतवणूक केली होती. कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा व इतर संचालकांनी गुंतवणूकदारांना १० ते १२ टक्के परतावा मिळेल, तसेच कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असून शेअर बाजारातून नफा मिळवून गुंतवणूकदारांना नफ्यातील सीईओ हिस्सा दिला जाईल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक (‘Infinite’ Investment Scam)

मात्र, यावर फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून सर्व संबंधित गुन्ह्यांचा एकत्रित तपास सुरू असून संचालक मंडळाबरोबर एजंटदेखील या प्रकरणात आरोपी ठरत आहेत. त्यामुळे एजंटांच्या धरपकडीसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.