INS Tushil :l नगर : भारताची (India) समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान (Advanced technology) असलेल्या स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील (INS Tushil) लवकरच भारतात दाखल होत आहे. हे जहाज 17 डिसेंबर 2024 रोजी रशियामधून भारतासाठी रवाना झाले आहे.
नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
तुशील रशियामध्ये झाले तयार
तुशील रशियामध्ये तयार करण्यात आले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात कार्यान्वित करण्यात आले होते. आयएनएस तुशील बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अटलांटिक महासागर आणि शेवटी हिंदी महासागरातून पार पडेल आणि अनेक मित्र देशांच्या बंदरांवर थांबेल. भारताचे सहकारी राष्ट्र असलेल्या रशियाकडून हे जहाज भारताच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
अशी आहेत वैशिष्ट्ये (INS Tushil)
जमिनीवरून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र
टॉर्पेडो, रॉकेट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि संप्रेषण सूट.
ऑप्टिकली नियंत्रित क्लोज रेंज रॅपिड फायर गन सिस्टम
आयएनएस तुशीलबद्दल माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा एक भाग असेल. तसेच भारतात पोहोचण्यापूर्वी आयएनएस तुशील पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील गिनीच्या आखातामध्ये चाचेगिरी विरोधी गस्त देखील करेल.