Inscription : नगर: कामरगाव (ता. नगर) येथील पुरातन बारवेवरील शिलालेख (Inscription) नुकताच उजेडात आला आहे. यामुळे येथील पुरातन ऐतिहासिक (Historical) ठेवा हाती लागण्याची शक्यता आहे. दिल्लीतील (Delhi) मराठा फौजेचे सेनापती पानिपतवीर अंताजी माणकेश्वर गंधे यांनी बांधलेल्या वाड्याच्या पाठीमागील जमिनीत एक बारव बांधली होती. त्यावर ‘उपरोक्त बारव आणि जमीन, रान ही तत्कालीन बाजार भावाने ७ हजार ५०० रुपयांच्या भाडेपट्टीवर आपल्या वंशजांना त्यांच्या संमतीने दिली, असा शिलालेख कोरून ठेवला होता. या शिलालेखाचे नुकतेच वाचन करण्यात आले.
हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार
बारवेच्या कमानीवर देवनागरी भाषेत शिलालेख
पुणे येथील वीरगळ आणि शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी या शिलालेखाचे वाचन करून इथला इतिहास उजेडात आणला आहे. सदरील शिलालेख बारवेच्या कमानीवर शुद्ध देवनागरी मराठी भाषेत आहे. मंगळवार दि. १८ मार्च १७६० रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी हा शिलालेख कोरल्याचा उल्लेख त्यावर आढळतो.
नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त
स्मृती जपणे हा या शिलालेखाचा हेतू (Inscription)
स्वत:ची जमीन आणि विहीर भाडेपट्टीवर वंशजांना त्यांच्या संमतीने दिल्याची स्मृती जपणे हा या शिलालेखाचा हेतू आहे. याकामी सतीश सोनवणे, कृष्णा गुडदे, एपिग्राफी म्हैसूरचे अधिकारी आदित्य सिंग रेड्डी, तसेच अंतांजींचे वंशज योगेश्वर गंधे यांचे सहकार्य लाभले.