Inscription : नगर : पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या एका पुरातन बारवेवरचा शिलालेख (Inscription) नुकताच उजेडात आला आहे. देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील राजेश्री आबाजी रणछोड यांना होळकरांच्या पंगतीला जेवायला बसायचा मान होता. त्यांनी येथील गावात १८व्या शतकात (18th Century) बारव बांधल्याचा उल्लेख या शिलालेखात आढळतो. यामुळे येथील पुरातन ऐतिहासिक ठेवा हाती लागण्याची शक्यता आहे. प्रजेसाठी बारव बांधून एक लोकहिताचे सामाजिक काम करून शिलालेख स्वरुपात कोरून ठेवणे हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे. या शिलालेखाचे नुकतेच वाचन करण्यात आले आहे.
नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल
अनिल दुधाणे यांनी इतिहास आणला उजेडात (Inscription)
पुणे येथील वीरगळ आणि शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी या शिलालेखाचे वाचन करून इथला इतिहास उजेडात आणला आहे. हा शिलालेख मौर्य शाळेच्या पुढे असलेल्या बारवेवर उजव्या बाजूस कोरलेला आहे. सदर शिलालेख उठाव स्वरूपाचा असून ८ ओळींचा देवनागरी मराठी भाषेत असून शिलालेखावर शेंदूर आणि रंगरंगोटी याचा मोठा थर आहे. हा शिलालेखावर अनेक वर्ष उघड्यावर असल्यामुळे काही अक्षरे झिजली आहेत. तरी लेखातील सर्व अक्षरे पूर्णपणे ठळकपणे दिसतात. सध्या ही बारव रवींद्र शेटे यांच्या मालकीची आहे.
हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल
बारवेचा पूर्व इतिहास (Inscription)
“शालिवाहन शकाच्या १७१३ व्या वर्षी विरोधी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध ७ इदुवासरे ग्रिष्म ऋतूमध्ये सूर्याचे उत्तरायण चालू असताना म्हणजेच ८ जून १७९१ सोमवारच्या दिवशी श्री गणपती आणि श्री सांब सदाशिव (महादेव) चरणी तत्पर असलेले राहुरी गावचे रहिवासी राजेश्री आबाजी रणछोड यांनी राहुरी या ठिकाणी बारव पूर्ण बांधून ती लोकार्पण करून श्री शिवाची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदोदित राहील.” असा उल्लेख या शिलालेखात आढळतो.
Table of Contents
शिलालेख:
१ .।। श्री ।।
२. ।। श्री गणेशाय नमः ।। श्री सांब स
३. ।। दाशिवाय नमः ।। सके १७१३ विरोधी
४. ।। कुत नामा ब्दे उत्तरायन ग्रिष्म रुतो
५ .।। ज्येष्ठ शुद्ध ७ इदुवासरे राहुरी ग्राम वा
६. ।। सि राजश्री आबाजी रणछोड नंद x
७. ।। प्रकारार्थं वापि स ता ( समाप्त ) ।। श्री सांबापर्ण
८. ।। मस्तु ।।
वाचक: अनिल किसन दुधाणे