Instagram New Feature : इन्स्टाग्रामवर वापरता येणार ‘हे’ नवीन फीचर

व्हाट्सॲपप्रमाणे आता इन्स्टाग्राम ॲपवरसुद्धा रीड रिसिप्ट्स ऑन ऑफ करण्याचा पर्याय युजर्सना उपलब्ध होणार आहे.

0

नगर : व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे आता इन्स्टाग्रामवरही (Instagram) एक खास फीचर येणार आहे. ज्याचा तरुण मंडळींपासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच उपयोग होणार आहे. व्हाट्सॲपप्रमाणे आता इन्स्टाग्राम ॲपवरसुद्धा रीड रिसिप्ट्स (Read Receipts) ऑन (On) ऑफ (Off) करण्याचा पर्याय युजर्सना उपलब्ध होणार आहे.  

नक्की पहा : नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचा ‘ओले आले’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर यासंबंधीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम ॲप एका फीचरवर काम करीत आहे; ज्यात युजर्स डायरेक्ट मेसेजची रिड रिसिप्टस बंद करू शकणार आहेत. जेणेकरून इतरांनी पाठवलेला संदेश तुम्ही बघितला आहे की नाही हे समोरच्याला कळणार सुद्धा नाही.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार   

हा पर्याय पाहण्यासाठी तुम्हाला सेटिंग्सवर क्लिक करून प्रायव्हसी आणि पॉलिसीवर क्लिक करावं लागेल. यात तुम्हाला एक पर्याय ‘व्हू कॅन सी युअर ॲक्टिव्हिटी’ हा पर्याय दिसेल. त्यात रिड रिसिप्टस हा पर्याय असेल. हा पर्याय ऑन असेल, तर तुम्ही तो ऑफ करा म्हणजे समोरच्याने पाठवलेला मेसेज तुम्ही बघितला आहे की नाही हे समोरच्याला अजिबात कळणार नाही.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हा पर्याय केव्हा आणि कधीपासून युजर्सना उपलब्ध होईल याची माहिती दिलेली नाही. पण, इन्स्टाग्राम ॲपचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर आगामी रिड रिसिप्टस फीचरचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यामुळे लवकरच इन्स्टाग्राममध्ये फिचर सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.