नगर : भारतातील मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता मधुमेहाच्या रुग्णांना देशी इन्सुलिन (Indigenous insulin) मिळणार असून तीही स्वस्त दरात दिली जाणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रुग्ण दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घेतात. आता त्यांना मेक इन इंडिया (Make In India) तंत्रज्ञानाने बनवलेले स्वदेशी इन्सुलिन उपलब्ध होणार आहे.
नक्की वाचा : ‘मराठा,धनगर आरक्षणासाठी उदयनराजेंनी घेतली मोदींची भेट
देशातील मधुमेही रुग्णांना आता १०० टक्के स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इतर ब्रँडच्या तुलनेत याची किंमतही कमी असणार आहे. अलीकडेच,युएसव्ही कंपनीने इन्सुक्विकसाठी Biogenomics कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हे भारतातील मधुमेह रूग्णांसाठी पहिले बायोसिमिलर इंसुलिन असणार आहे. कमीत कमी ७०० रुपये अशी या इंजेक्शनची किंमत असणार आहे.
अवश्य वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा
सध्या देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी ११.४ टक्के म्हणजे सुमारे ११ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. याशिवाय सुमारे १३ कोटी लोक प्री-डायबेटिस आहेत. त्यांची स्थिती फार कमी वेळात मधुमेहापर्यंत पोहोचू शकते. अशा कालात स्वस्त दरात इन्सुलिन उपलब्ध करण्याचा प्रयत्न USV आणि Biogenomics कंपनीकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्सुक्विक हे भारतात बनवलेले उत्पादन आहे. या इन्सुलिनची जागतिक दर्जाची गुणवत्ता मजबूत क्लिनिकल प्रोग्रामद्वारे निश्चित केली जाते. हे सर्व मेट्रो शहरे आणि टियर-II शहरांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.