International Conference : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल संजय खामकर यांची लंडनमधील ग्रेस इन येथे २४ व २५ एप्रिल रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी (International Conference) निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रेस इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.
नक्की वाचा : कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान कामाचा प्रारंभ
स्वप्निल खामकर यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या कायद्याशी संबंधित योगदान, सामाजिक न्यायाची कल्पना आणि आर्थिक धोरणांवर चर्चा केली जाणार आहे. विशेषतः त्यांच्या लंडनमधील शिक्षणाचा प्रभाव या विषयावर भर दिला जाणार आहे. स्वप्निल खामकर यांच्या निवडीमुळे शहरासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्रमुख चर्चेचे विषय आंबेडकरांचे कायदेशीर योगदान, समावेशक विकास, सामाजिक न्याय चळवळी आणि आजच्या काळातील त्यांचे विचार किती लागू आहेत, यावर आधारित असणार आहेत.
अवश्य वाचा : शिर्डीत तीन दुकाने सील; भाविकांची करत होते लूट
द सीईओ ऑफ द माईंड या पुस्तकाचे प्रकाशन (International Conference)
स्वप्निल खामकर याने युवकांसाठी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नुकतेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. तो २०१७ मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना वास्को-द-गामा वर आधारित ८ द गेम इज ऑन हा पुस्तक लिहिणारा महाराष्ट्रातील अत्यंत कमी वयाचा दुसरा युवक ठरला होता. त्याने ट्रॅडिशनल पब्लिशर ओथरचा मान मिळवला असून, त्याचे लिखाण युवकांना स्फूर्ती देणारे ठरत आहे.