International Thalassaemia Day : नगर : जागतिक थॅलेसेमिया दिना (International Thalassaemia Day) निमित्त अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात (Ahilyanagar District Hospital) विशेष शिबिराचे आज (ता. १५) आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश चंद्रकांत बागल (Chandrakant Bagal) यांच्या हस्ते झाले. यावेळी थॅलेसेमिया (Thalassaemia) आजाराविषयी माहिती देऊन उपचार पद्धतीबाबत जनजागृती करण्यात आली.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
यांच्या सहकार्याने आयोजन
जिल्हा रुग्णालयातील हे शिबिर ऋतुजा फाउंडेशन, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन, सक्षम संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, न्यायाधीश तेजस्विनी निराळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे विश्वस्त उद्योजक नरेंद्र फिरोदिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, सक्षम संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्रीधर बापट, सक्षम संस्थेच्या पुणे येथील सक्षम संस्थेचे प्रांत कार्यालय प्रमुख अशोक जव्हेरी, सक्षम संस्थेचे अहिल्यानगर अध्यक्ष डॉ. राजीव चिटगोपीकर आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (International Thalassaemia Day)
डॉ. ॲड. अंजली केवळ या अनेक वर्षांपासून थॅलेसेमिया या आजारावर रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी काम करत आहेत. आमचे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन त्यांना नेहमीच मदत करतो. थॅलेसेमिया आजाराचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे आजाराविषयी माहिती व उपचाराविषयी रुग्णांनी ऋतुजा फाउंडेशनशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. ऋतुजा केवळ म्हणाल्या, थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे. आई-वडिलांकडून बाळामध्ये हे आजार संक्रमित होतात. आई व वडील दोघेही थॅलेसेमियाचे रुग्ण असतील तर त्यांच्या प्रत्येक प्रेग्नंसीमध्ये जन्माला येणाऱ्या २५ टक्के बाळांत थॅलेसेमिया मेजर आजार असू शकतो. हा नावाप्रमाणे गंभीर आजार आहे. या आजारात बाळाच्या शरीरात रक्ताची कमतरता तयार होते. यात बाळाच्या शरीरातील रक्त संपत जातं. अशा बाळांना नंतर रक्त भरावे लागते. त्यांचे स्वतःचे रक्त तयार होत नाही. या आजारातून तुमच्या बाळाला बरे करायचे असल्यास काही उपचार पद्धती आहेत. यावर काही नवीन संशोधनही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात सक्षम संस्थेच्या खजिनदार वर्षा पाठक यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा समन्वयक डॉ. आशिष इरमल यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. ऋतुजा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा ऋतुजा केवळ यांनी अनुमोदन दिले. ऋतुजा फाउंडेशनच्या संस्थापक सचिव डॉ. ॲड. अंजली केवळ यांनी प्रास्तविक केले. महेश जोगदंड यांनी आभार मानले.