International Women’s Day : गावात ‘शिवी’ दिल्यास ५०० रुपये दंड; कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय

International Women's Day : गावात 'शिवी' दिल्यास ५०० रुपये दंड!... कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय

0
International Women's Day : गावात 'शिवी' दिल्यास ५०० रुपये दंड!... कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय
International Women's Day : गावात 'शिवी' दिल्यास ५०० रुपये दंड!... कोळगावच्या महिलांचा ऐतिहासिक निर्णय

जागतिक महिला दिनानिमित्त कोळगाव ग्रामसभेत स्वच्छतेबाबतही कडक ठराव

International Women’s Day : श्रीगोंदा : गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक वादात आई-बहिणीचा उद्धार करून शिवीगाळ करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी (Women) पुढाकार घेतला आहे. जो कोणी शिवी देईल, त्या संबंधित व्यक्तीला ५०० रुपये दंड (Penalty) ठोठावण्याचा ऐतिहासिक ठराव घेण्यात आला आहे.

नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद

गावच्या सामाजिक शिस्तीसाठी कौतुकास्पद निर्णय

जागतिक महिला दिनाचे (International Women’s Day) औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी गावच्या सामाजिक शिस्तीसाठी अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सभेच्या सुरुवातीला शेती क्षेत्रात आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. सभेचे अध्यक्षपद ज्येष्ठ अंगणवाडी सेविका श्रीम. शकुंतला देशमुख यांनी भूषविले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

महिला सक्षमीकरणासाठी ठोस कृती (International Women’s Day)

“महिला सक्षमीकरणासाठी केवळ घोषणा नकोत, तर ठोस कृतीची गरज आहे. पुढील वर्षी हा सण अधिक व्यापक स्वरूपात साजरा केला जाणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देताना सांगितले.

स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेताना ग्रामसभेने गावातील प्रत्येकाने आपले घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. ज्याच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा आढळेल, त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दिल्यास संबंधिताला १०० रुपये दंड केला जाणार असल्याचा ठराव घेण्यात आला. तसेच एकमेकांच्या वादात “आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड” आकारण्याचा ऐतिहासिक ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ग्रामसभेच्या अध्यक्ष श्रीम. शकुंतला देशमुख यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने महिलांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार मानले आणि व्यसनमुक्तीसाठी महिलांनी संघटित होण्याचे आवाहन केले.

या ग्रामसभेसाठी उपसरपंच विलास शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. कवडे एस.एस. यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.