International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा

International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा

0
International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा
International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा

International Yoga Day : नगर : जिल्हा प्रशासन (District Administration), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेळ संघटना व विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) वाडिया पार्क (Wadia Park Stadium) येथे उत्साहात वातावरणात संपन्न.

International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा
International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा

नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

विविध विभाग प्रमुख उपस्थित

यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) बाळासाहेब बुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. 

अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष

विविध संघटनांचा सहभाग (International Yoga Day)

सर्वप्रथम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योगदिनाची सुरुवात करण्यात आली. योग दिनाचे महत्व विषद करून योगदिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमात शहरातील विविध खेळ संघटना, पोलिस ॲकॅडमी प्रशिक्षणार्थी, खेळाडू, नागरिक व योगसाधक सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग संस्था, योग विद्याधाम, एमएमवायटीसी, योग संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू, नागरिक व मान्यवरांनी योग प्रार्थना, आसने, प्राणायाम ध्यान धारणा करुन व योग संकल्पद्वारे योग दिन साजरा केला.

International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा
International Yoga Day : जिल्हा क्रीडा संकुल येथे योगदिन उत्साहात साजरा

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी भाऊराव वीर,श्रीमती प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक, संतोष वाबळे, प्रविण कोंढावळे, विशाल गर्जे, मनिष राठोड, अविनाश काळे, शैलेश गवळी, मल्हार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले