International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

0
International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

International Yoga Day : नगर : जिल्हा रुग्णालय (Ahilyanagar District Hospital) व जिल्हा आयुष रुग्णालय (AYUSH Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आयुष रुग्णालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला.

नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डावरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना धोंडे-बारवकर, जिल्हा आयुष रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर, डॉ. मनोज घुगे, परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली कोरडे, योगविद्याधामचे कार्यकारी अध्यक्ष सुभाष पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
International Yoga Day : जिल्हा आयुष रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष

योगवर्गात योगासने, प्राणायाम व ध्यान (International Yoga Day)

या योगवर्गात आयुष मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशाप्रमाणे योगासने, प्राणायाम, ध्यान करण्यात आले. योग वर्गाचे संचालन योगविद्याधाम संस्थेच्या योग प्रशिक्षक श्रीमती दीपमाला लांडे आणि श्रीमती कविता साखरे यांनी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी योग शास्त्राचा रोगोपचार आणि स्वास्थ रक्षणासाठीबाबतचे महत्व विषद केले. दि. २३ जुन ते २७ जुन दरम्यान जिल्हा आयुष रुग्णालयात योग प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे. दुपारी ४ ते ५ दरम्यान योग सत्र होणार आहेत. नागरिकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्ती शेळके यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुष वैद्यकीय अधिकारी  डॉ.शौनक मिरीकर,  डॉ. जयश्री मस्के , डॉ. इर्शाद मोमीन, डॉ.नाजिया शेख, डॉ. शोभा धुमाळ, डॉ.अर्चना लांडे, असिस्टंट मेट्रन श्री.अजिंक्य पवार व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.