Investment : नगर : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) महाराष्ट्रासाठी इतिहास ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने (Maharashtra) कालच्या (ता. २२) दुसर्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल. यात अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात सिलॉन बिव्हरेज व टॉरल इंडिया या दोन कंपन्यांच्या माध्यमातून एक हजार ५३९ कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) होणार आहे. त्यातून एक हजार ६५० युवकांना रोजगार मिळेल.
नक्की वाचा : आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या; समोरून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनविण्याचे स्वप्न
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते तीन लाख पाच हजार कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून तीन लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत तीन लाख पाच हजार कोटीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे तीन लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.
अवश्य वाचा : …’त्या’ वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले स्पष्टीकरण
अॅमेझॉन करणार ७१ हजार ७९५ कोटीची गुंतवणुक (Investment)
दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती ७१ हजार ७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३ हजार १०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. मागील दोन दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ लाख कोटीचे करार केले असून, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५ हजार २०० कोटीचे करार केले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन कंपन्या येणार (Investment)
अहिल्यानगर जिल्ह्यात सिलॉन बिव्हरेज व टॉरल इंडिया या दोन कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात सिलॉन बिव्हरेज ही कंपनी अन्न व पेय संदर्भातील आहे. ती जिल्ह्यात एक हजार ३९ कोटीची गुंतवणूक करणार आहे. त्यातून ४५० युवकांना रोजगार मिळणार आहे. टॉरल इंडिया ही कंपनी अॅल्युमिनियम व मेटल्स संदर्भातील आहे. ही कंपनी जिल्ह्यात ५०० कोटीची गुंतवणूक करणार असून त्यातून १२०० युवकांना रोजगार मिळणार आहे.
फडणवीसांनी घेतली टोनी ब्लेअर यांची भेट (Investment)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. २२) ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक आदी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.