नगर : आयपीएलच्या १७ (IPL 2024) व्या पर्वातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पार पडली. या सामन्यात चेन्नईनं गुजरातला ६३ धावांनी मात देत विजय मिळविला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामन्याच्या सुरूवातीपासूनच चेन्नईने आपली पकड कायम ठेवल्याने गुजरात संघाला तो निर्णय फायदेशीर ठरला नाही.
नक्की वाचा : घरच्या मैदानावर आरसीबीचा पंजाबवर विजय;दिनेश कार्तिक ठरला गेमचेंजर
युवा कर्णधारांच्या मुकाबल्यात ऋतुराज गायकवाडने मारली बाजी (IPL 2024 CSK vs GT)
सामन्याच्या सुरवातीपासूनच सीएसके च्या प्रत्येक फलंदाजाने धावफलकात आपले योगदान देऊन संघाची धावसंख्या २०६ वर नेऊन ठेवली. गोलंदाजीतही चेन्नईने आपली चमक दाखवत गुजरातच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. दोन नव्या युवा कर्णधारांच्या मुकाबल्यात ऋतुराज गायकवाडने बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
गुजरात टायटन्स चे फलंदाज या सामन्यात अयशस्वी ठरले. साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला ३० चा आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. संघाचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल (८) आणि रिध्दिमान साहा (२१) हे मोठी खेळी करू शकले नाही, याचा संघाला फटका बसला. या दोघांनाही दीपक चहर बाद केले. त्यानंतर मिचेलच्या गोलंदाजीवर धोनीने झेप घेत एक जबरदस्त कॅच पकडला आणि विजय शंकरला (१२) बाद केले. धोनीच्या या कॅचचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
हेही पहा : वडिल-मुलगा येणार एकत्र;शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदापर्ण करणार
गुजरातचे फलंदाज फेल (IPL 2024 CSK vs GT)
डेव्हिड मिलरही मोठी कामगिरी करू शकला नाही. तर ओमरजाई देखील ११ धावांवर खेळत असताना देशपांडे कडून झेलबाद झाला. यानंतर राहुल तेवतिया (६) आणि राशीद खान (१) यांना मुस्तफिझूर रहमानने झेलबाद केले. हे दोन्ही झेल रचिन रवींद्रने घेतले. उमेश यादवने १ षटकार लगावत १० धावा केल्या तर जॉन्सने ५ धावा केल्या. एकंदरीतच गुजरातचे फलंदाज फेल झाल्याने संघाला तब्बल ६३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
सलामीवीर रचिन रवींद्रने २० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्यात. अवघ्या ४ धावांनी त्याचे पहिले अर्धशतक हुकले. त्यानंतर ऋतुराजने फटकेबाजी सुरू केली आणि त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे मात्र १२ धावा करत बाद झाला. गुजरातकडून राशीद खानने २ विकेट तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्माने १ विकेट घेतली. तर आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदवणाऱ्या चेन्नईकडून दीपक चहरने २, तुषार देशपांडे २ आणि मुस्ताफिजूर २ विकेट्स घेतले. तर मिचेल आणि पाथिरानाला एक विकेट घेण्यात यश मिळाले.