नगर : आयपीएल २०२४ च्या पाचव्या सामन्यात काल (ता.२५) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans)आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात गुजरातने हातातून निसटत चाललेला विजय पुन्हा खेचून आणला आहे. शुभमन गिल च्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला आहे.
नक्की वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
गुजरातचा दणदणीत विजय (IPL 2024 GT vs MI)
६ चेंडूत १९ धावांची मुंबईला इंडियन्सला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. मात्र पुढच्या दोन चेंडूवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरातने दणदणीत विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सने ११ वर्षांचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल २०१३ पासून आतापर्यंत कधीही पहिला सामना जिंकलेला नाही आणि तेच त्यांनी कायम ठेवले आहे.
हेही पहा : ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी सलामी;आरसीबीला नमवले
कसा झाला सामना ? (IPL 2024 GT vs MI)
मुंबई इंडियन्सला १६९ धावांचा पाठलाग करताना २०ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या दोघांनी अनुक्रमे ४३ आणि ४६ धावा करुन मुंबईला विजयाच्या जवळ आणून ठेवण्यात हातभार लावला. मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर इतर फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २०१२ नंतर यंदाही आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले आहे. मुंबईला २० व्या ओव्हरमध्ये १९ धावांची गरज असताना फक्त १३ धावाच करता आल्या. कॅप्टन हार्दिकने अखेरच्या ओव्हरमध्ये निर्णायक क्षणी आपली विकेट टाकली आणि गुजरातचा विजय पक्का झाला. शुभमन गिलने गुजरातला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात जिंकवलं.
जिंकल्यानंतर शुभमन गिल म्हणाला की, “दव येत असताना मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली, ते अप्रतिम होतं. आमच्या फिरकीपटूंनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे आम्ही गेम मध्ये कायम राहिलो. आम्हाला मुंबईवर फक्त दबाव वाढवायचा होता आणि त्यांच्याकडून चुका होण्याची वाट पाहायची होती”,असं गिल म्हणाला.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.