IPL 2024 : आयपीएलच्या मैदानात हैदराबादची सरशी;मुंबईचा सलग दुसरा पराभव

हैदराबादने मुंबईला २७८ धावांचे लक्ष दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत २४६ धावाच करू शकला. तिलक वर्माने मुंबईसाठी शानदार फलंदाजी करताना सर्वाधिक ६४ धावांची खेळी साकारली.

0
IPL 2024
IPL 2024

नगर : आयपीएल २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) घरच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तब्बल ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना क्लासेनच्या नाबाद ८० धांवांच्या जोरावर २० षटकांत २७७ धावा करताना आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. हैदराबादने मुंबईला २७८ धावांचे लक्ष दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत २४६ धावाच करू शकला. तिलक वर्माने मुंबईसाठी शानदार फलंदाजी करताना सर्वाधिक ६४ धावांची खेळी साकारली. मात्र तरीही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

नक्की वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली

सनरायझर्स हैदराबादने रचला इतीहास (IPL 2024)

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या ने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हैदराबादच्या टीमने याचा फायदा उठवत ३ विकेटवर २७७ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सला या धावांचा पाठलाग करताना यश आले नाही. त्यांनी या धावसंख्येचा पाठलाग करताना ५ विकेटवर २४६ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादनं सलग दुसऱ्या मॅच मध्ये २०० हून अधिक धावा केल्या. मुंबईवरील विजयासह त्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये सर्वाधिक धावसंख्या आणि इतर विक्रमांची नोंद झाली.अभिषेक शर्मा याने १६ बॉलमध्ये ५० धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद खेळाडूंचं आयपीएलमधील वेगवान अर्धशतक ठरलं. ट्रेविस हेडने याच मॅचमध्ये १८ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या.

हेही पहा : अभिनेत्री गिरिजा ओकने केली नव्या नाटकाची घोषणा!

हैदराबादच्या खेळाडूंची तुफान खेळी (IPL 2024)

क्लासेननं सलग दुसऱ्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या केली. क्लासेनने ३४ बॉलमध्ये ७ सिक्ससह ४ चौकारांच्या जोरावर ८० धावा केल्या. तर, ट्रेविस हेडनं ३ सिक्स आणि ९ चौकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या. अभिषेक शर्मानं २३ बॉलमध्ये ७ सिक्स आणि ३ चौकारांसह ६३ धावा केल्या. हैदराबादने  यासह इतर खेळाडूंच्या धावांसह ३ विकेटवर २७७ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादने कालच्या मॅच मध्ये १८ षटकार मारले. यामध्ये अभिषेक शर्मानं ७ षटकार मारले. ट्रेविस हेडनं ३ षटकार मारले. क्लासेननं देखील ७ सिक्स मारले तर मार्क्रम यानं एक सिक्स मारला. हैदराबादच्या तीन फलदांजांनी २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा केल्या.

मुंबईनं हैदराबादच्या २७७ धावांचा पाठलाग करताना २० सिक्स मारले. मुंबईमधील चार फलंदाजांनी २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. इशान किशनने १३ बॉलमध्ये ३४, नमन धीरनं १४ बॉलमध्ये ३०, रोहित शर्मानं १२ बॉल मध्ये २६ आणि रोमारियओ शेफर्डनं ६ बॉलमध्ये १५ धावा केल्या. या सर्वांचं स्ट्राइक रेट २०० पेक्षा अधिक होतं. मुंबईसाठी तिलक वर्मानं ६४ धावा केल्या. रोहित शर्माने ३, इशान किशननं ४, नमन धीरनं २, तिलक वर्मानं ६, हार्दिक पांड्यानं १, टीम डेविडनं ३ आणि शेफर्डनं १ असे एकूण २० सिक्स मुंबईच्या टीमनं मारले. दरम्यान, दोन्ही संघांनी मिळून ३१ चौकार या सामन्यात मारले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here