IPL 2024 RCB vs PBKS: घरच्या मैदानावर आरसीबीचा पंजाबवर विजय;दिनेश कार्तिक ठरला गेमचेंजर 

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला.

0
IPL 2024 RCB vs PBKS
IPL 2024 RCB vs PBKS

नगर : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या सहाव्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) ने घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. दिनेश कार्तिकची तुफान फटकेबाजी आणि विराट कोहलीची विस्फोटक ७७ धावांच्या जोरावर आरसीबीने आयपीएलमधील हा पहिला विजय मिळविला.

नक्की वाचा : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा पराभव;शुभमन गिलची विजयी सुरवात  

पंजाब किंग्सकडून आरसीबीला १७७ धावांचे आव्हान (IPL 2024 RCB vs PBKS)

पंजाब किंग्सने दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात दणक्यात झाली. सॅम करनच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिले आणि ७व्या षटकात विराट कोहलीला जीवदान मिळाले. बेयरस्टो ने स्लिपमध्ये कोहलीचा झेल सोडला. तर राहुल चहरनेही कोहलीचा झेल सोडला आणि याचा फटका पंजाबला पहिल्या षटकासह संपूर्ण सामन्यात बसला. कोहलीने विस्फोटक फलंदाजी करत बाद होण्यापूर्वी ४९ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ७७ धावा केल्या होत्या.

दिनेश कार्तिकचा आक्रमक अंदाज (IPL 2024 RCB vs PBKS)

विराट बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने सुरूवातीपासूनच आक्रमक अंदाज दाखवला आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. कार्तिकने त्याच्या १० चेंडूच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारासह २८ धावा केल्या. तर सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या महिपाल लोमरोरने त्याला साथ देत ८ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह १७ धावा केल्या. या दोघांच्या अखेरच्या षटकांमधील आक्रमक खेळीमुळे आरसीबीने आयपीएल २०२४ मध्ये पहिला विजय नोंदवला.

अवश्य वाचा : मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विराट चांगल्या चांगली फलन्दजी करत असल्याने त्याला बाद करणं अवघड झालं होतं. पण आरसीबी संघातील त्याचा पूर्वीचा साथीदार हर्षल पटेल जो आता पंजाब संघाचा भाग आहे. त्याने विराटला झेलबाद केलं. विराट बाद झाल्यानंतर १४ धावांवर अनुज रावतही झेलबाद झाला. पंजाब संघाकडून हरप्रीत ब्रारने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांच्या स्पेलमध्ये १३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाच्या नावेही २ विकेट्स आहेत. सॅम करन आणि हर्षल पटेलच्या खात्यातही १-१ विकेट आहे.

या सामन्यात पंजाबच्या शशांक सिंगने आपल्या छोट्या पण प्रभावी खेळीने सर्वांनाच चकित केले. शशांकने अखेरच्या षटकात ८ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. त्याच्या या अखेरच्या षटकातील फटकेबाजीमुळे संघाची धावसंख्या १७६ वर नेऊन ठेवली. आरसीबीकडून यश दयाल आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी १ विकेट घेतली तर मॅक्सवेल आणि सिराजने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here