IPL 2024 SRH vs CSK: ऋतुराजच्या चेन्नईला सनरायझर्स हैदराबादने केलं चीतपट

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी अधिक धावा दिल्या. ज्याचा संघाला मोठा फटका बसला.

0
IPL 2024 SRH vs CSK
IPL 2024 SRH vs CSK

नगर : आयपीएल २०२४ च्या रणसंग्रामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने चेन्नईचा (SRH vs CSK) सहा विकेटने पराभव केला. चेन्नईने (CSK) दिलेल्या १६६ धावांचे आव्हान हैदराबादने (SRH)११ चेंडू आणि ६ विकेट राखून सहज पार केले. नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला.

नक्की वाचा : आरबीआयचे नवीन पतधोरण जाहीर;रेपो दर स्थिर  

अभिषेक शर्माची दणकेबाज फलंदाजी (IPL 2024 SRH vs CSK)

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी अधिक धावा दिल्या. ज्याचा संघाला मोठा फटका बसला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पॅट कमिन्स ने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १६५ धावा केल्या. उत्तरात हैदराबादने १८.१ षटकांत ४ गडी गमावून १६६ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.

अवश्य वाचा : राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित; साकारणार उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका  

हैदराबादच्या सलामी वीरांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. पहिल्या षटकात हेडचा झेल सुटला. ज्याचा चेन्नईला फटका बसला आणि अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने चेन्नईला धक्काच दिला. त्याने १२ चेंडूत ३७ धावा करत सामना चेन्नईपासून दूर नेला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी १७ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी दीपक चहर ने  तोडली. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजा कडून झेलबाद केले.

चेन्नईच्या हातून सामना गेला (IPL 2024 SRH vs CSK)

हैदराबादच्या बॉलर्सनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. चेन्नईचे सलामीवीर लवकर बाद झाले. रचिन रवींद्रनं १२ धावा केल्या. तर, ऋतुराज गायकवाडनं २६ धावा केल्या. यानंतर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांनी चेन्नईचा डाव सावरला. मात्र,शिवम दुबेनं ४५ धावा केल्या असताना डावाच्या १४व्या ओव्हरमध्ये कॅप्टन पॅट कमिन्सननं शिवब दुबेला बाद केलं. यानंतर चेन्नईला पुढील सहा ओव्हरमध्ये म्हणाव्या तशा धावा काढता आल्या नाहीत. त्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here