नगर : बहुप्रतिक्षीत आयपीएलचा थरार उद्यापासून (ता.२२) रंगणार आहे. चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर आयपीएल २०२४ चा पहिला सामना रंगणार आहे. आयपीएलच्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangaluru) यांच्यात होणार आहे. यावेळी दोन्ही संघ सज्ज असताना चेपॉक देखील सज्ज झालं आहे. चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की वाचा : लोकसभेमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या;नवीन तारीख जाहीर
विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक ए.आर.रहमान आणि सोनू निगम आयपीएल २०२४ च्या उद्घाटन समारंभात परफॉर्मन्स करणार आहे. २२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील परफॉर्म करणार आहेत. हा उद्घाटन सोहळा सांयकाळी ६.३० वाजता सुरू होईल आणि सामना ७. ३० वाजता सुरू होणार आहे.
आयपीएलची सुरुवात ब्लॉक ब्लस्टर सामन्याने (IPL 2024)
आयपीएल २०२४ ची सुरुवात ब्लॉक ब्लस्टर सामन्याने होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. आरसीबी प्रत्येक विभागात संतुलित दिसत आहे. मात्र सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण थोडे कमजोर दिसत आहे. यासोबतच डेव्हॉन कॉनवे आणि पाथीरानाला झालेल्या दुखापतींमुळेही सीएसकेचे टेंन्शन वाढले आहे.
हेही पहा : अभिनेता तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार ओटीटीवर पदार्पण!
२४ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स खेळणार (IPL 2024)
सध्या ७ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाईल. २४ मार्चला आयपीएल २०२२ चे विजेते आणि गेल्या वर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स आणि पाच वेळा चॅम्पियन राहिलेले मुंबई इंडियन्स रविवारी (ता.३०) अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत.