IPL 2025 New Schedule: भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतातील आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले होते.मात्र दोन्ही देशात शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर आता देशात पुन्हा एकदा आयपीएलचा धडाका सुरू होणार आहे. आयपीएलचे नवे वेळापत्रक (IPL 2025 New Schedule) जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित १७ सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या १७ मे (17th May) पासून पुन्हा एकदा आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात (IPL matches begin) होणार आहे.तर अंतिम सामना ३ जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
नक्की वाचा : दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते.आता ते पुन्हा सुरू होणार असून आहेत.सरकार, सुरक्षा संस्था आणि सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, बीसीसीआयने १७ मे पासून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!’किंग कोहली’चा कसोटी क्रिकेटला अलविदा
पहिला सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरु (IPL 2025 New Schedule)
नवीन वेळापत्रकात, दोन दिवशी दोन सामने खेळवले जातील. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यावर, पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जाईल. उर्वरित सामन्यांसाठी जयपूर, बेंगळुरू, लखनौ, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरातील मैदानांची निवड करण्यात येणार आहे.
प्लेऑफ सामने कधी सुरू होणार ?(IPL 2025 New Schedule)
मूळ वेळापत्रकानुसार प्लेऑफ टप्पा २० मे पासून सुरू होणार होता. मात्र आता नवीन वेळापत्रकानुसार,प्लेऑफ टप्पा २९ मे पासून सुरू होईल. पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला जाईल. एलिमिनेटर सामना ३० मे रोजी, दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी आणि अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जाणार आहेत.