IPL 2025:आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबीत रंगणार!

0
IPL 2025:आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबीत रंगणार
IPL 2025:आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबीत रंगणार

IPL 2025 : आयपीएलच्या १८ व्या सत्राला (IPL 2025) आजपासून कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवरून (Eden garden stedium) सुरुवात होणार आहे. १८ व्या पर्वातील पहिला सामना हा गतविजेता कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू (KKR VS RCB) या दोन संघात पार पडेल. सामना सुरु होण्यापूर्वी  सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल, पंजाबी गायिका करण औलिजा रंग भरणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळा आणि पहिली मॅच यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे.

नक्की वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार 

आयपीएलचा यंदाचा पहिला सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भारतीय हवामान विभागाने गुरुवार ते रविवार या कालावधीत दक्षिण बंगाल परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिल्या लढतीमध्ये अजिंक्य रहाणे केकेआरचं तर आरसीबीचं नेतृत्व रजत पाटीदार करेल. मात्र,या लढतीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून याशिवाय रविवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’राबविली जाणार;महसूल मंत्र्यांचा निर्णय

आयपीएलची अंतिम लढत २५ मे रोजी होणार (IPL 2025)

क्रिकेटविश्वातील सगळे प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत.लिलावानंतर संघांची रचना बदलली आहे.नवा हंगाम, नवे कर्णधार असं प्रत्येक संघासाठी समीकरण आहे. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेची अंतिम लढत २५ मे रोजी होणार आहे. दहा संघांमध्ये जेतेपदासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांनी प्रत्येकी ५ वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. लिलावानंतर प्रत्येक संघात मोठे बदल झालेत. पाच संघांचे कर्णधार बदलले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व आता अजिंक्य रहाणे करणार आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असणार आहे. दिल्लीने अक्षर पटेलला कर्णधारपदी नियुक्त केलं आहे.

सोहळा कुठे होणार? (IPL 2025)

एक लाख क्षमता असलेल्या इडन गार्डन्स मैदानावर हा सोहळा आणि त्यानंतर सलामीची लढत रंगणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे.स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर क्रिकेटप्रेमींना हा उदघाटन सोहळा पाहता येईल.तसेच जिओ सिनेमा आणि हॉटस्टार या ठिकाणी देखील तुम्हाला आयपीएलचा उद्घाटन सोहळा पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here