Iran US Israel War : टॉप लीडरशिप संपुष्टात; पण इराणचा प्रतिकार संपेना!

Iran US Israel War : इराणची टॉप लीडरशिप संपुष्टात; पण इराणचा प्रतिकार संपेना!

0
Iran US Israel War : इराणची टॉप लीडरशिप संपुष्टात; पण इराणचा प्रतिकार संपेना!
Iran US Israel War : इराणची टॉप लीडरशिप संपुष्टात; पण इराणचा प्रतिकार संपेना!

Iran US Israel War : नगर : इराणच्या सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी (Supreme Leader Election) बोलवण्यात आलेल्या सभेवर अमेरिका आणि इस्त्रायलने हवाई हल्ला (Iran US Israel War) केला आहे. या हल्ल्यात बहुतेक सभा सदस्यांचा मृत्यू आणि बरेच जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप जवळजवळ संपुष्टात आली आहे. हा हल्ला खामेनेईच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला मोठा फटका आहे. हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती वाढली आहे.

इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझाही मारले गेल्याची माहिती

अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेतेही मारले गेलेत. त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरही इस्रायलने बॉम्बफेक केल्याने इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे. मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझाही हल्ल्यात मारले गेल्याची माहिती आहे. सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसनी एजई आणि गार्डीयन काऊन्सिलचे सदस्य अली रझा आराफी प्रामुख्याने शिल्लक आहेत.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

इराणमधल्या ऐतिहासिक राजकीय स्थळांना लक्ष्य (Iran US Israel War)

इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा पाचवा दिवस आहे. इस्रायलनं पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. इस्रायलनं इराणच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केला तसंच इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या इमारतीवरही हल्ला केला. तसंच इराण लष्कराचं मुख्यालयही उद्धवस्त करण्यात आलं. राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण स्फोट झाले असून काही भागांमध्ये आगीचे मोठे लोळ उठले. अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरले. दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा 787 वर गेल्याची माहिती समोर येत आहे. तर 650 हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे.