Ishwar Nimse : अहिल्यानगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम अन त्यातून नोकरी साकारणे यापलीकडेही विचार करणे गरजेचे आहे. सध्या देशाची रोजगाराची (Employment) परिस्थिती पाहता व्यवसायाभिमुख शिक्षण कौशल्याच्या (Skills) जीवावर उपजीविका चालता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबर विविध कौशल्य अंगीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर चे संस्थापक ईश्वर निमसे (Ishwar Nimse) यांनी केले.

नक्की वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी
कार्यशाळेचे आयोजन
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व विद्यार्थी विकास मंडळ, रमेश फिरोदीया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकुर यांच्या माध्यमातून ‘शिक्षण व कौशल्य काळाची गरज’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वर निमसे यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य स्वयंरोजगाराच्या संधी कौशल्य घेऊन कसे साधता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि भविष्य आणि शिक्षणाबरोबर कौशल्य घेण्याची शपथ घेतली. छोटासा स्वयंरोजगार साधून शिक्षणाचा खर्च भागविण्याचे अभिवचन घेतले.
अवश्य वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे
विविध कौशल्य शिकण्यासाठी महाविद्यालयात नियोजन (Ishwar Nimse)
कार्यशाळा संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हेमलता राठोड विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रणजीत गिरी सर होते. तसेच कार्यक्रमाची प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी अध्यापक गणेश साळुंखे सर यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वृषाली डोके यांनी केले. यावेळी प्राध्यापक मतू खेमनार विभागीय समन्वयक अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य शिकण्यासाठी महाविद्यालयात नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक पोपट खेमनार यांनी केले. यावेळी युवा उद्योजक अवधूत घोरपडे दत्ता कृपा उद्योग समूह अहिल्यानगर हे उपस्थित होते.
