Ishwarpur Name: आता इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर;नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता

0
Ishwarpur Name:आता इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर;नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता
Ishwarpur Name:आता इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर;नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता

Ishwarpur Name: अखेर इस्लामपूरच्या (Islampur) ईश्वरपूर (Ishwarpur) नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता (Central Government Approval) मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार आहे.

नक्की वाचा: दरे गावात आलो की अनेकांपोटदुखीना ,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर   

छगन भुजबळ यांनी केली घोषणा (Ishwarpur Name)

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर’ शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.

अवश्य वाचा: आदिनाथ कोठारे साकारणार डिटेक्टिवची भूमिका!

अनेक वर्षांच्या मागणीला यश  (Ishwarpur Name)

मागील अनेक वर्षापासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती. गेल्या ४०-५० वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासन स्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे,अशी मागणी चार – पाच दशकांपूर्वी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर अशी घोषणा केली आहे.

इस्लामपूरच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. नामांतराचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला होता, त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा, अशा सर्वच शासकीय, निमशासकीय सर्व स्वरूपाच्या व्यवसाय, उद्योग, संस्था, स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागेल.